पर्यावरणपूरक अस्थी विसर्जनाची नवी दिशा
नाशिकरोड (प्रतिनिधी):
Brahmanwade eco-conscious ritual नाशिकच्या गोदावरी-दारणा संगमस्थळी अस्थी विसर्जनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर जोगल टेंभी ग्रामपंचायतीने एक महत्त्वपूर्ण ठराव पारित केला. या ठरावाद्वारे पंचक्रोशीतील नागरिकांना नदी प्रदूषण रोखण्यासाठी अस्थी व निर्माल्य नदीत टाकू नये, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत ब्राह्मणवाडे गावाने एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पोलीस पाटील रामराजे यांचा पर्यावरणपूरक संदेश (Brahmanwade eco-conscious ritual)
गावाचे पोलीस पाटील कमलाकर रामराजे यांनी गावकऱ्यांना पर्यावरणस्नेही पर्याय सुचवत मृत्यू नंतरची श्रद्धांजली निसर्गरम्य पद्धतीने द्यावी, असे आवाहन केले. त्यांच्या या विनंतीला प्रतिसाद देत गावातील गणेश रामराजे यांनी आपल्या मातोश्रींच्या अस्थींचे विसर्जन नदीऐवजी आपल्या शेतात करण्याचा निर्णय घेतला.
स्मृतींना सजीव करणारी हरित भेट
बुद्धवासी बू. शांताबाई काळूजी रामराजे (वय ८५) यांच्या अस्थी शेतातील एका खड्ड्यात विधीपूर्वक विसर्जित करण्यात आल्या. विशेष म्हणजे, या जागेवर फळझाडांची लागवड करून त्यांनी आईच्या आठवणींना सजीव ठेवले. हे झाड भविष्यात प्राणवायू, फळे, सावली आणि हरित वातावरण निर्माण करत स्मृतींचा जिवंत वारसा जोपासेल.
समाजासाठी प्रेरणादायी पाऊल
या कृतीमुळे समाजात एक सकारात्मक संदेश पसरला आहे — मृत व्यक्ती फक्त आठवणीत नाही, तर निसर्गाच्या रूपातही आपल्या सोबत राहू शकते.
पोलीस पाटील रामराजे यांनी सांगितले की, “गावकऱ्यांनीही असेच पर्यावरणपूरक आणि प्रेरणादायी निर्णय घेऊन निसर्गसंवर्धनात मोलाचा वाटा उचलावा.”
