MHADA Lottery Nashik 2025 : फक्त 5 लाखांत घर! अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट

MHADA Lottery Nashik 2025: House for just 5 lakhs! Last date to apply is 11th August

MHADA च्या घरांची स्वस्तात लॉटरी जाहीर, नाशिक विभागात ५ लाखांपासून मिळणार घरे – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नाशिक : MHADA Lottery Nashik 2025 घराच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडा (MHADA) नाशिक विभागासाठी १४८५ घरांची आणि छत्रपती संभाजीनगरसाठी १३५१ घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केवळ ५ लाख रुपयांपासून घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे.

अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची सुरुवात : ३० जून २०२५
  • अर्जाची अंतिम तारीख : ११ ऑगस्ट २०२५
  • अर्ज यादी जाहीर : १८ ऑगस्ट, दुपारी २ वा.
  • अंतिम पात्र यादी : २५ ऑगस्ट २०२५
  • अर्ज संकेतस्थळ : housing.mhada.gov.in

नाशिकमध्ये कुठे मिळणार घरे? MHADA Lottery Nashik 2025

अल्प उत्पन्न गटासाठी (LIG)

  • किंमत : ₹११.९४ लाख ते ₹१५.३१ लाख
  • ठिकाणे :
    • वडाळा शिवारातील पार्श्वनाथ प्रोजेक्ट
    • आडगावमधील प्रणव गार्डन

मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG)

  • किंमत : फक्त ₹५.४८ लाख
  • ठिकाणे :
    • अहिल्यानगर सिव्हिल हुडको, सावेडी परिसर

एकूण किती घरे उपलब्ध?

  • अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) : ११४८ सदनिका
  • अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) : २६६ सदनिका
  • मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) : ४ सदनिका
  • सर्वसमावेशक योजना (२०%) : ६३ सदनिका
  • MHADA गृहनिर्माण योजना : ४ सदनिका

MHADA Lottery 2025 अर्ज कसा कराल?

MHADA च्या घरासाठी अर्ज करण्यासाठी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.