श्रीफळ वाढवून परंपरेनुसार यात्रेची तयारी सुरू
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Mhasoba Maharaj : नाशिक, 18 फेब्रुवारी – देवळाली गावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा (Mhasoba Maharaj ) यंदा दि. 6 मार्च 2025 रोजी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी होणार आहे. यात्रेच्या तयारीला मंगळवार (दि. 18 फेब्रुवारी) रोजी श्रीफळ वाढवून पारंपरिक पद्धतीने प्रारंभ करण्यात आला.
पंच कमिटी व ग्रामस्थांची जय्यत तयारी
यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच कमिटी व ग्रामस्थांकडून नियोजन सुरू आहे. या वेळी पंच कमिटीचे अध्यक्ष अॅड. शांताराम बापू कदम, उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, कार्याध्यक्ष बाळनाथ सरोदे, सेक्रेटरी रूंजादादा पाटोळे, खजिनदार शिवाजी लवटे, सहखजिनदार राजेंद्र गायकवाड, तसेच सदस्य सुर्याभान घाडगे, सुनील गायकवाड, संतोष खोले, सुरेश खोले, राजाराम भागवत, कैलास चव्हाण, संपत खोले, विजय खोले, जयंत गाडेकर, सुधाकर जाधव, साहेबराव खजूॅल, विकास गिते, वैभव वाळेकर, संतोष माळवे, प्रविण कुलथे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री म्हसोबा महाराज (Mhasoba Maharaj) यात्रा – धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक
श्री म्हसोबा महाराज यात्रा ही गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अभिमान आहे. दरवर्षी हजारो भाविक या यात्रेला हजेरी लावतात. यात्रेच्या अनुषंगाने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यात्रेची वैशिष्ट्ये आणि सोहळा
- श्री म्हसोबा महाराजांची पालखी मिरवणूक
- भक्तांसाठी महाप्रसाद आणि विशेष पूजा विधी
- परंपरागत लोकनाट्य, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम
ग्रामस्थ आणि पंच कमिटीच्या एकत्रित सहभागाने ही यात्रा भव्य आणि उत्साहात साजरी होणार आहे.
यात्रेच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा
(पंच कमिटी – देवळाली गाव)