अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अंजनगाव सूर्जी आणि अचलपूर या तालुक्यांमध्ये सोमवारी दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी ४.२ रिक्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. या भूकंपाचे झटके दोन सेकंद टिकले, ज्यामुळे नागरिक घाबरले, परंतु कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाल्याचे समजले नाही.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गावातील आणि शहरातील लोकांनी जमीन हलल्याची जाणीव होताच घराबाहेर धाव घेतली आणि एकमेकांना विचारपूस करू लागले. अनेक ठिकाणी पलंग, टेबल, आणि टीन हलल्याचे अनुभव आले, आणि काही ठिकाणी जमिनीतून सौम्य आवाजही ऐकू आला. तथापि, कोणतीही गंभीर हानी नोंदवली गेली नाही.