नाशिक : महिला वकिलाच्या क्रेडिट कार्डाचा दुरूपयोग करून अज्ञात तरुणाने १० हजार ५०० रुपयांची चोरी केली. ही घटना ७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील द्वारका येथील बेला पेट्रोलपंपावर घडली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भाविका अशोक गोसावी (मेरी लिंकरोड), या स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड धारक वकील, त्या दिवशी पेट्रोलपंपावर पेट्रोल भरवण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी २० ते २५ वयोगटातील एका इसमाने गोसावी यांच्या स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डाचा दुरूपयोग करून १० हजार रुपये रोख व ५०० रुपयांचे पेट्रोल भरून, क्रेडिट कार्ड स्वाइप करून एकूण १० हजार ५०० रुपयांची रक्कम काढून नेली.
गोसावी यांनी त्वरित संबंधित घटनेची तक्रार नोंदवली असून, नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. पोलिसांना विश्वास आहे की लवकरच आरोपीला अटक केली जाईल.