Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, सुवर्ण युगाची घोषणा!

Donald Trump 47th President of the United States

वॉशिंग्टन, 21 जानेवारी: डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली असून आपल्या पहिल्या भाषणातच अमेरिकेत सुवर्ण युगाची सुरुवात झाल्याची घोषणा केली आहे. शपथविधी सोहळा भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता पार पडला. यावेळी अमेरिकन संसदगृहात हा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्याला जगभरातील नेत्यांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

मोदींच्या खास शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांना “माझे प्रिय मित्र” म्हणून संबोधित करत खास शब्दांत शुभेच्छा दिल्या. मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी तुमचं अभिनंदन. भारत-अमेरिका संबंधांच्या प्रगतीसाठी तुमच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. तुमच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!”

जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव
युकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीही ट्रम्प यांना शुभेच्छा देत पुढील काळात यूएस-यूके संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली. जगभरातील अनेक नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्या पुनरागमनाचं स्वागत केलं आहे.

पहिल्या दिवशीच 200 निर्णयांची तयारी
राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच ट्रम्प यांनी देशातील सीमा सुरक्षा, ऊर्जा धोरण, आणि राष्ट्रीय आणीबाणी संदर्भातील 200 पेक्षा जास्त महत्वाच्या निर्णयांवर स्वाक्षरी करण्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये यूएस आर्मी आणि होमलँड सिक्युरिटीला दक्षिण सीमेच्या सुरक्षेसाठी तातडीचे आदेश देण्यात येणार आहेत.

थंडीमध्ये ऐतिहासिक शपथविधी
गेल्या काही दशकांमध्ये प्रथमच अमेरिकन संसदेत राष्ट्राध्यक्ष शपथविधी पार पडला. अमेरिकेतील प्रचंड थंडीमुळे हा निर्णय घेण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनाने अमेरिकेत राजकीय उलथापालथ होत असताना, “सुवर्ण युग सुरू होत आहे,” असं विधान करत त्यांनी आपल्या कार्यकाळाच्या दिशेचा रोख स्पष्ट केला आहे.