Nashik Road: मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे नाशिकच्या गंधर्व नगरीत भितीचे वातावरण

Mokat krutyacha चावा

Latest News : नाशिक रोड येथील गंधर्व नगरी परिसरातील नेपाळी कुटुंबातील १२ वर्षीय मुलाला मोकाट कुत्रा चावल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकरोड-जेलरोड भागात मोकाट कुत्र्यांनी आतापर्यंत ८ जणांना चावा घेतला आहे,

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या घटनांचा वारंवारता आणि नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी या प्रकार नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरत असल्यामुळे नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शासकीय दवाखाने देखील कार्यक्षम नसल्यामुळे चाव्याने जखमी झालेल्या नागरिकांना योग्य उपचार मिळवण्यात अडचणी येत आहेत.

मनसेचे कार्यकर्ते रोहन देशपांडे यांनी नाशिक महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांना या घटनेची माहिती तत्काळ पोहोचवली असून, जखमी मुलांवर योग्य उपचार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे.

महापालिका प्रशासनाचे अपयश आणि या परिस्थितीमुळे नागरिकांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन मनसेचे रोहन देशपांडे यांनी केले आहे.