मोखाडा (१ जुलै २०२५): Mokhada ITI Placements
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील वीर तिलका मांजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Mokhada ITI) येथील तब्बल ६० प्रशिक्षणार्थ्यांची निवड नाशिक येथील प्रसिद्ध Bosch India कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारीसाठी करण्यात आली आहे. ही निवड थेट मुलाखतीद्वारे पार पडली.
Bosch कंपनीचे प्रशिक्षण व विकास व्यवस्थापक अनंत दांडेकर यांनी ITI संस्थेला भेट देत तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांची व्यक्तिगत मुलाखत घेतली आणि योग्य उमेदवारांची निवड केली.
फिटर (Fitter) – १७ प्रशिक्षणार्थी
इलेक्ट्रिशियन (Electrician) – २० प्रशिक्षणार्थी
मोटार मेकॅनिक (Motor Mechanic) – २३ प्रशिक्षणार्थी
या निवड प्रक्रियेनंतर प्राचार्य रोहन चुंबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
मोखाडा सारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना Bosch सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत शिकाऊ उमेदवारीची संधी मिळणे हे कौतुकास्पद मानले जात असून, विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.
या यशस्वी उपक्रमामागे गटनिदेशक विजय खंदारे, शिल्पनिदेशक साहेबराव धनवटे, तसेच राजेश हरळ, शशिराज बाविस्कर आणि प्रकाश मार्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.