नाशिक : शहरातील रस्त्यांवर गॅस पाइपलाइनसाठी खोदलेले खड्डे अद्याप बुजवले न गेल्याने नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने यावर गंभीर नोटीस घेत एमएनजीएल (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड) आणि संबंधित ठेकेदारांना तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा भविष्यात खोदकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही, असा ठाम इशारा महापालिकेने दिला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महापालिकेची ठोस भूमिका*
महापालिकेत झालेल्या बैठकीत शहर अभियंता संजय अग्रवाल आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांनी एमएनजीएल अधिकाऱ्यांना खडसावले. बैठकीत ठेकेदारांना खड्डे बुजवण्यासाठी ठोस नियोजन करण्याचा इशारा दिला गेला.
खोदलेल्या खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा पुढील परवानग्या थांबवल्या जातील असे स्पष्ट आदेश महापालिकेने दिले.
अपघात आणि गैरसोयीला नागरिक वैतागले
गेल्या काही दिवसांपासून शहरातील उपनगरांत गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम सुरू आहे. मात्र, रस्ते पुन्हा पूर्ववत केले जात नसल्याने अनेक ठिकाणी अपघातांची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळ्यापूर्वी सर्व खड्डे बुजवा आणि नियोजित वेळेत कामे पूर्ण करा, असा कठोर आदेश महापालिकेने दिला.
- रस्त्यांची आयुर्मर्यादा:
सामान्यतः रस्त्यांचे आयुष्य तीन वर्षे असते; त्यामुळे वेळेत देखभाल गरजेची आहे.
- नागरिकांची तक्रार वाढू नये म्हणून खोदकामानंतर त्वरित खड्डे बुजवावेत.
- पादचारी आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत.