अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या; दोन आरोपी काही तासांतच अटकेत
Murder: नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बांगलादेश वस्तीत एका 33 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या Murder करण्यात आली आहे. मृताचे नाव शेरा सूर्यप्रकाश मलिक असून, गीतेश उर्फ रजत उके आणि भोजराज मोरेश्वर कुंभारे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
हत्या का आणि कशी झाली?
पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधांवरून वाद
मुख्य आरोपी गीतेश उके याचे शेरा मलिकच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते, असा संशय शेराला होता. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. शेराने गीतेशला समजावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गीतेशने त्याला न जुमानता धमक्या द्यायला सुरुवात केली. दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या.
मित्राच्या मदतीने रचला खूनाचा (murder) कट
शेरा मलिकला मारण्याचा कट गीतेशने त्याचा मित्र भोजराज कुंभारेसोबत रचला. भोजराजने शेराची माहिती काढून गीतेशला दिली आणि शेरा घरी असल्याची खात्री दिल्यावर गीतेशने त्याला बाहेर बोलावले.
कोयत्याने 11-12 वार, शेरा जागीच ठार
शेरा बाहेर येताच गीतेश आणि भोजराजने त्याच्या गळ्यावर कोयत्याने 11-12 वार केले. या हल्ल्यात शेरा मलिक जागीच ठार झाला. घटनेनंतर काही तासांतच पाचपावली पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
नागपूर पुन्हा हादरले
या घटनेमुळे नागपूर पुन्हा एकदा खुनाच्या प्रकरणाने हादरले आहे. अनैतिक संबंध, राग आणि सूड यातून घडलेला हा खून सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांकडून आरोपींचा कसून तपास सुरू आहे.