स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित ७७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा १० ते १३ सप्टेंबर दरम्यान मंगलोर, कर्नाटक येथे पार पडल्या. या स्पर्धेत नाशिकच्या अदिती हेगडेने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत महिलांच्या गटात एक सुवर्ण आणि चार रौप्य पदक पटकावून आपल्या नावाची नोंद केली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अदितीने ४ बाय १०० मीटर मिक्स फ्री स्टाइल रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तसेच, १०० मीटर आणि २०० मीटर फ्री स्टाइल, ४ बाय २००, ४ बाय १०० मिडले, आणि ४ बाय १०० मिक्स मिडले रिले प्रकारात रौप्य पदके मिळवली. या कामगिरीमुळे ती नाशिकसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.
अदितीने नाशिकच्या राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर प्रशिक्षण घेतले असून, तिला शंकर मादगुंडी सर आणि विकास भडांगे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, जलतरण तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप मॅडम यांनी देखील महत्त्वाचे सहकार्य केले. अदितीच्या या यशाबद्दल तिच्या पालकांनी आणि प्रशिक्षकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.