नाशिक रोड रेल्वे पोलिसांची धडाकेबाज कारवाई: ३२ लाखांचे सोने चोरी करणारा मुख्य आरोपी अटकेत

**Swift Action by Nashik Road Railway Police: Arrest of Main Suspect in ₹32 Lakh Gold Theft Case

नाशिक रोड, प्रतिनिधी : नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी ३२ लाखाचे सोने चोरी करणा-या मुख्य संशयिताला अटक केली आहे. ही कारवाई नाशिक रेल्वे स्थानकात करण्यात आली. या संशयिताला हावडा एक्स्प्रेसमधून पश्चिम बंगालला पळून जात असताना पकडण्यात आले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या चोरी प्रकरणी पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी अमित पाल (वय २१ वर्षे, रा. पश्चिम बंगाल) याने मुंबईतून ३२ लाख रुपयांचे सोने चोरी केल्यानंतर पश्चिम बंगालला पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भात पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिंदे यांनी नाशिकरोड रेल्वे पोलिसांना माहिती दिली होती. त्यानुसार नाशिकरोड पोलीस नाईक बाळू आव्हाड यांनी प्रभारी पोलिस अधिकारी सचिन बनकर, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक हरफूलसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ कारवाई केली. आरपीएफचे निरीक्षक दिनेश यादव, मनीष कुमार सिंग आणि नाशिक रोड रेल्वे पोलिस ठाण्याचे अजित शिंदे यांच्या मदतीने हावडा एक्स्प्रेसमध्ये आरोपीचा शोध घेण्यात आला. अमित पालला नाशिक रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. यानंतर त्याला पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या धडाकेबाज कारवाईमुळे पोलीस नाईक बाळू आव्हाड व सहका-यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या वेगवान कामगिरीमुळे मोठ्या प्रमाणात सोने चोरीचे प्रकरण उघडकीस आले तसेच आरोपीला अटक करण्यास यश मिळाले आहे.

Leave a Reply