यंदा मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल; तर बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल. तसेच गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल.* *गौरी आवाहन शुभ मुहूर्त**ज्येष्ठा गौरी आवाहन* *शुभ मुहूर्त १० सप्टेंबर रोजी सूर्यदयापासून ते* *संध्याकाळी ८ वाजून ०४ मिनिटांपर्यंत**राहू काळ : दुपारी ३ ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.**गौरी विसर्जन मुहूर्त हा ९-५३ रात्री पर्यंत आहे.*गौरी आवाहन हे अनुराधा नक्षत्र वर केले जाते.तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीचे आवाहन केले जाते. राज्यभरात गौराईच्या आगमनाची आणि पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी उभी गौरी तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रीतही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते. प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात. मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन, असेही म्हटले जाते. या दिवशी गौराईचा श्रृंगार केला जातो. तिला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जाईल. अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन, तसेच माहेरवाशीणदेखील म्हटले जाते.दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते. तिसर्या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.सौ मधुरा पंचाक्षरीनाशिक
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.