नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी नवीन नाशिक, सिडको, सातपूर रस्त्यांची केली पाहणी

सिडको, सातपूर रस्त्यांची केली पाहणी

नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागनाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी आज नवीन नाशिक, सिडको, सातपूर या भागातील रस्त्यांची अचानक पाहणी केली. मागील आदेशानुसार या भागातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या कामाची प्रगती पाहण्यासाठी आयुक्तांनी अचानक दौरा करून सुरु असलेल्या रस्ते दुरुस्तीचे काम तपासले.आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की नागरिकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते प्रदान करणे ही पालिकेची प्राथमिकता आहे आणि त्यामुळे खड्डे बुजवण्याचे काम जलद गतीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.या पाहणी दौऱ्यात आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त (शहर) प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे, गुणनियंत्रक कार्यकारी अभियंता नितीन पाटील, उपअभियंता विनायक गांगुर्डे आणि उपअभियंता हेमंत पठे उपस्थित होते.नाशिक महानगरपालिकेच्या या जलद आणि ठोस निर्णयामुळे शहरातील रस्ते लवकरच खड्डेमुक्त होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply