Nashik Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नाशिकच्या दुर्गेश इंगळेचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Nashik Accident News: Fatal accident on Samruddhi Highway; Nashik's Durgesh Ingle dies, three seriously injured

Samruddhi Mahamarg Accident | Nashik Youth Dies | Bhiwandi Car Crash | Nashik News Today

नाशिक (Nashik Accident News): समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि. १६ जुलै) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नाशिकच्या सिडकोमधील उत्तमनगर परिसरात राहणाऱ्या दुर्गेश गोविंद इंगळे (वय २५) या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

समृद्धी महामार्गावर डंपरला जोरदार धडक – एक ठार, तिघे जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश इंगळे आणि त्याचे तीन मित्र चारचाकी वाहनाने भिवंडीहून नाशिकच्या दिशेने जात होते. समृद्धी महामार्गावरील एका टोलनाक्याजवळ त्यांची कार वेगात असताना समोरून चालणाऱ्या डंपरला मागून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की दुर्गेश याचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील उर्वरित तिघे मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातामुळे उत्तमनगर परिसरात हळहळ (Nashik Accident News)

दुर्गेश इंगळे याच्या निधनामुळे संपूर्ण उत्तमनगर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. या अचानक झालेल्या अपघातामुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.