२० जून २०२५ | नाशिक पर्यावरण बातमी
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक मनपाकडून (NMC) ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास सुरू आहे. सध्या शहरात ७ ईव्ही चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आले असून, येत्या आठवड्यात आणखी ३ केंद्रे सुरू होणार आहेत. ही कृती राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत होत असून, यामुळे नाशिक शहर ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
EV चार्जिंग स्टेशन्स – नाशिकमध्ये कार्यरत केंद्रे:
नाशिक महानगरपालिकेने १० कोटी रुपयांच्या निधीतून २० चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातील सात ठिकाणी सेवा सुरू झाली आहे:
- राजीव गांधी भवन
- प्रमोद महाजन गार्डन
- अंबड लिंक रोड
- सातपूर अग्निशमन केंद्र
- कृषी नगर जॉगिंग ट्रॅक
- सातपूर विभागीय कार्यालय
- महात्मा नगर क्रिकेट मैदान
लवकरच सुरू होणारी EV चार्जिंग केंद्रे:
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात सुरू होणारी तीन केंद्रे:
- गणेशवाडी भाजी मार्केट
- अमृतधाम अग्निशमन केंद्र (पंचवटी)
- बी. डी. भालेकर मैदान
ही केंद्रे महावितरणच्या सहाय्याने उभारली जात आहेत आणि पुढील काही दिवसांत सार्वजनिक वापरासाठी खुले होणार आहेत.
EV चार्जिंगसाठी भविष्यातील लोकेशन्स (Future Charging Locations in Nashik):
महापालिकेच्या नियोजनानुसार, उर्वरित १० EV चार्जिंग स्टेशन पुढील विभागांमध्ये उभारण्यात येणार आहेत:
- नाशिक पूर्व
- नाशिक पश्चिम
- सिडको
- पंचवटी
- नाशिक रोड
नाशिककरांसाठी ही योजना प्रदूषण नियंत्रणाबरोबरच इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. महापालिकेच्या या पावलामुळे शहरातील पर्यावरणपूरक वाहतूक सुलभ होणार आहे.