नाशिक |Nashik Beef Racket– इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वडाळागाव परिसरातील अनधिकृत कत्तलखान्यावर धाड टाकत १५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, गोवंश कत्तलीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई इंदिरानगर भागात खळबळ उडवणारी ठरली आहे.
पत्र्याच्या घरात सुरु होता बेकायदेशीर गोवंश कत्तल व्यवसाय
इंदिरानगर परिसरातील म्हाडा वसाहतीच्या मागील बाजूस पत्र्याच्या घरात गुपचूपपणे गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सौरभ माळी यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तत्काळ धाड टाकून मोठ्या प्रमाणावर गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त केली.
जप्त मुद्देमाल आणि अटक करण्यात आलेले आरोपी
या कारवाईत २०० किलो गोमांस, २ इनोव्हा कार, ७ दुचाकी असा एकूण १५.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
- नासिर कय्यूम शेख (वय ४०, कसाईवाडा, वडाळानाका)
- अब्दुल रहिम कुरेशी (वय ३७, वडाळानाका)
- सईद मजिद कुरेशी (वय ३५, नागसेननगर, वडाळानाका)
- हसनैन अफरोज कुरेशी (वय १९, बागवानपुरा)
- अफरोज बिस्मिल्ला कुरेशी (वय ५१, बागवानपुरा)
- रहीम अब्दुल्ला कुरेशी (वय ५८, श्रमिकनगर, गंजमाळ)
पोलिसांची तडाखेबंद कारवाई (Nashik Beef Racket)
संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सहपोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर, अंमलदार संतोष फुंदे, पवन परदेशी, सागर कोळी, अमोल कोथमिरे, सौरभ माळी, जयलाल राठोड, सागर परदेशी, दीपक शिंदे, योगेश जाधव यांचा समावेश होता.