नाशिक: नवनिर्वाचित आमदार सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले आणि देवयानी फरांदे यांचा सत्कार सोहळा नाशिक महानगर भारतीय जनता पक्षाच्या BJP वतीने वसंतस्मृती कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष प्रशांत जाधव अध्यक्षस्थानी होते. सत्कार सोहळ्यात बंडखोरांना पक्षात पुनर्वप्रवेश न देण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
कार्यक्रमात आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे आणि ॲड. राहुल ढिकले यांच्यासह भाजपा BJP प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर सतीश कुलकर्णी, विजय साने, सरचिटणीस नाना शिलेदार, सुनील केदार, ॲड. श्याम बडोदे, हिमगौरी आडके आहेर यांची उपस्थिती होती.
नवनिर्वाचित आमदार सीमा हिरे यांनी मतदारसंघात अधिक भाजप BJP नगरसेवक निवडून आलेल्या भागातूनच महापौर निवडला जावा, अशी मागणी केली. सातपूर-सिडको परिसरातून महापौर निवडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार सीमा हिरे यांनी बंडखोरांना पक्षात पुनर्वापसी होऊ नये, असे स्पष्टपणे सांगितले. त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांच्या एकजुटीनेच निवडणूक जिंकली आहे, आणि बंडखोरांनी पक्षाविरोधात केलेली कृती माफ केली जाऊ शकत नाही.

राहुल ढिकले यांनीही बंडखोरांवर टीका करत पक्षात त्यांच्या पुनर्वापसीला विरोध दर्शवला. त्यांनी सांगितले की, २०१४ आणि २०१९ मधील चुका पुन्हा होऊ देऊ नका.

आ. देवयानी फरांदे यांची टीका
आमदार फरांदे यांनी बंडखोरांविरोधात आवाज उठवला. त्यांनी सांगितले की, बंडखोरांनी पक्षासाठी त्रास निर्माण केला असून अशा गद्दारांना थारा देणे पक्षासाठी घातक ठरेल. त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नेते विजय साने यांनी सांगितले की, भाजप BJP पक्ष हा धर्मशाळा नाही की कोणीही कधीही येऊन पक्षाची प्रतिष्ठा कमी करेल. त्यांनी बंडखोरांना पक्षातून कायमचे वगळण्याचा आग्रह धरला.
शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आगामी महापालिका निवडणुकांसाठी सामान्य कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी करण्याचेही आवाहन करण्यात आले.
महापालिका निवडणुकीसाठी रणनीती
सत्कार सोहळ्यात पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आगामी महापालिका निवडणुकीत मतदारसंघनिहाय सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या भागात महापौरपद देण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपची BJP मजबूत पकड निर्माण करण्यासाठी आतापासून कामाला लागण्याची घोषणा करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांना पुन्हा अध्यक्षपद देण्याची मागणी केली. यावेळी सभासद नोंदणी संयोजक म्हणून नाना शिलेदार यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमातील सर्व आमदारांनी कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आपल्याला मोठे यश मिळाल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांचा सन्मान राखणे आणि बंडखोरांना थारा न देणे हा संदेश सत्कार सोहळ्यातून देण्यात आला.
नाशिक महानगर भाजपने BJP आपल्या एकजुटीचा प्रत्यय या कार्यक्रमातून दाखवून दिला. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्यासाठी यापुढे संघटनात्मक स्तरावर अधिक मेहनत घेण्यात येणार आहे.
हे पण वाचा नाशिकमध्ये भाजपचा मेळावा