Vidhansabha election: नाशिकमध्ये भाजपचा झेंडा फडकला: तीनही आमदारांचा विजय

Nashik BJPcha Vijayshree: Teenhi Aamdaranchi Hattrick

नाशिक: विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नाशिकमध्ये पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला आहे. भाजपचे तीनही विद्यमान आमदारांनी विजय मिळवत आपला गड राखला आहे. या विजयामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक पूर्व मतदारसंघ
भाजपचे उमेदवार अँड राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) गणेश गीते यांचा तब्बल 87,535 मतांनी पराभव केला. या विजयासह ढिकले यांनी सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला.

नाशिक मध्य मतदारसंघ
चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार वसंत गीते यांचा 17,856 मतांनी पराभव केला. या विजयासह फरांदे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधली.

नाशिक पश्चिम मतदारसंघ
सीमा हिरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत इतिहास रचला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा पराभव करत 68,177 मतांनी विजय मिळवला. सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येत त्यांनीही हॅट्रिक साधली.