नाशिक विभागात महाराष्ट्र ई वाहन धोरणाअंतर्गत नाशिक-बोरिवली मार्गावर १२ मीटरच्या नवीन इलेक्ट्रिक बससेवेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला, विशेषतः मतदानाच्या दिवशी अनेकांनी प्रवासासाठी ही सेवा निवडली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राज्य परिवहन महामंडळाने ई वाहन धोरणाच्या अंमलबजावणीअंतर्गत नाशिक, बोरिवली, कसारा, आणि सप्तश्रृंगी गड या मार्गांवर ई बस चालवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, नाशिक-सप्तश्रृंगी गड आणि नाशिक-कसारा मार्गांवर अधिक फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
मुंबई नाका बस स्थानकात ज्येष्ठ नागरिक सुभाष कुलकर्णी यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रवाशांना गुलाबपुष्प आणि पेढे देऊन स्वागत करण्यात आले. ही बससेवा पर्यावरणपूरक प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरली असून यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे.
ही बससेवा खासगी वाहनांपेक्षा अधिक किफायतशीर ठरत आहे, तसेच राज्यातील ई-वाहन धोरणाला चालना देण्याचा भाग आहे.