Nashik bread price hike : पाव होणार ‘महागडा’: २५ जानेवारीपासून नाशिकमध्ये पावाच्या किमतीत २०% वाढ

नाशिक बेकरी असोसिएशनने पावाच्या किमतीत Bread २५ जानेवारीपासून १५-२०% वाढ जाहीर केली आहे. महागाई, कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ, इंधन आणि मजुरीच्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक: शहरातील बेकरी असोसिएशनने पावाच्या bread किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जानेवारी २०२५ पासून हा नवा दर लागू होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेल्या महागाईच्या झळा, कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली उसळी, इंधनाचा वाढता खर्च आणि मजुरीच्या वाढत्या दरांमुळे बेकरी व्यवसाय संकटात सापडला आहे.

उद्योगाच्या टिकावासाठी अनिवार्य निर्णय
बेकरी असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, पाव bread उत्पादन करताना बेकरी उद्योजकांना आर्थिक तडजोड करावी लागत होती. राज्यातील इतर भागांप्रमाणे दरवाढ न करता, ग्राहकांसाठी नाशिकमधील उत्पादकांनी जुने दर कायम ठेवले होते. मात्र, मैदा, तेल, इंधन आणि मजुरीच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने यापुढे जुन्या दरात पाव विक्री शक्य नाही, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

ग्राहकांसाठी विनंती
“पाव bread हा प्रत्येक घराचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे दरवाढीचा निर्णय सहज घेतलेला नाही. मात्र, टिकावासाठी हा निर्णय अपरिहार्य होता. ग्राहकांनी सहकार्य करावे,” असे आवाहन नाशिक बेकरी असोसिएशनने केले आहे.

पाव bread खरेदीसाठी आता अधिक खर्च करायची तयारी करा!

दरवाढीनंतर नाशिककरांवर महागाईचा आणखी एक फटका बसणार असून, रोजच्या जेवणातील ‘पाव’ आता महाग होणार आहे.