Nashik Citylink emergency button misuse नाशिक सिटीलिंक बसमध्ये विनाकारण ‘इमर्जन्सी बटण’ दाबल्यास होणार दंड

Nashik Citylink emergency button misuse

सिटीलिंक प्रशासनाचा इशारा : प्रवाशांनी जबाबदारीने वापर करावा

आता चुकीच्या वापरावर थेट दंडात्मक कारवाई

नाशिक, Nashik Citylink :नाशिककरांसाठी एक महत्त्वाची सूचना! सिटीलिंक बसमध्ये (Nashik Citylink) प्रवासादरम्यान उपलब्ध असलेल्या इमर्जन्सी बटणाचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सिटीलिंक प्रशासनाने यासंदर्भात अधिकृत इशारा दिला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

२० किमीपर्यंत सेवा देणाऱ्या सिटीलिंक बसचा लाखो नागरिकांना लाभ

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. मार्फत शहर व उपनगरात सिटीलिंक बससेवा कार्यरत आहे. दररोज लाखो प्रवासी या सेवांचा लाभ घेत आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून प्रत्येक बसमध्ये आणि नाशिक सिटी बस’ अ‍ॅपमध्ये इमर्जन्सी बटण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा खरी अडचण आल्यास तत्काळ मदतीसाठी उपयोगी आहे.

कुतूहलापोटी बटण दाबणे आता ठरणार महागात

अलीकडील काळात काही प्रवासी फक्त मजा किंवा कुतूहलापोटी इमर्जन्सी बटण दाबत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची गैरसोय तर होतेच, पण खर्‍या गरजूंना वेळेवर मदत पोहोचत नाही.

गैरवापर थांबवण्यासाठी कठोर पावले

सिटीलिंक प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की,

“इमर्जन्सी बटणाचा विनाकारण वापर केल्यास संबंधित प्रवाशावर दंड आकारला जाईल.”

यामुळे प्रवाशांनी केवळ अत्यावश्यक प्रसंगीच या सुविधेचा वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.