नाशिकः नाशिक शहरात सिटीलिंकच्या 250 बसेस विविध मार्गांवर सार्वजनिक बससेवा पुरवतात. आता सिटीलिंकने नवीन सीबीएस ते त्रिवेणी हाईट्स/म्हाडा (आडगाव) या मार्ग क्रमांक 118 वर बस सेवा सुरू केली आहे. ही सेवा सुरू झाल्याने परिसरातील हजारो प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
तपोवन डेपो ते त्रिवेणी हाईट्स (आडगाव)
सकाळी 6:10.नवीन सीबीएस ते तपोवन
सकाळी 8:00नवीन सीबीएस ते त्रिवेणी हाईट्स (आडगाव)07:15, 08:45, 10:30, 12:00, 13:45, 15:15, 17:00, 18:30,त्रिवेणी हाईट्स (आडगाव) ते नवीन सीबीएस,06:30, 08:00, 09:30, 11:15, 12:45, 14:30, 16:00, 17:45, 19:15,मार्ग क्रमांक 118 वर बस हिरावाडी, त्रिकोणी बंगला, साई शिव नगर, के.के. वाघ अॅग्रीकल्चर महाविद्यालय, राऊत मळा मार्गे त्रिवेणी हाईट्सपर्यंत धावणार आहे आणि त्याच मार्गाने परत येणार आहे.
या मार्गावर बससेवेची मागणी होऊन, सिटीलिंक प्रशासनाने संपूर्ण सर्व्हे केल्यानंतर ही सेवा सुरू केली आहे. बुधवारी या मार्गावरील बस धावताना दिसल्या.
सिटीलिंकने अधिक प्रवाशांनी या नवीन मार्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.सिटीलिंक बससेवा नाशिकमधील सार्वजनिक वाहतुकीत क्रांती घडवत आहे.