Nashik : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेईकल डे’ आणि ‘युनिफॉर्म डे’ चा नवा प्रयोग

IMG 20250103 085823

Nashik : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेईकल डे’ आणि ‘युनिफॉर्म डे’ चा नवा प्रयोगनाशिकमध्ये पर्यावरणपूरक पावले उचलण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ जाहीर करण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकारी सार्वजनिक वाहने किंवा सायकल वापरून कार्यालयात येणार आहेत. शहरात वाढत्या वाहने आणि प्रदूषणाच्या चिंतेतून एक दिवस सर्व वाहनांना विश्रांती देण्याचा हा अभिनव निर्णय घेण्यात आलेला आहे.याच दिवशी ‘युनिफॉर्म डे’ सुद्धा साजरा केला जाईल.

अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निळ्या रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या किंवा काळ्या रंगाची पॅन्ट बंधनकारक केली आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी पिवळ्या रंगाचा कुर्ता किंवा साडी असणार आहे. हा प्रयोग महिन्यातून एकदाच केला जाणार असला तरी, यशस्वी झाल्यास भविष्यात इतर कार्यालयांमध्ये सुद्धा याचे पालन होईल.

ही प्रणाली लागू केल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वाहनांची गर्दी कमी होईल आणि कॅम्पस मोकळा होण्याची शक्यता आहे. टेलरमार्फत युनिफॉर्मचे वितरण सुरू झाले असून, कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.