Sandeep Karnik : सोनसाखळी चोऱ्यांचा पर्दाफाश; ‘मोक्का’तर्गत तीन टोळ्यांवर कारवाई

Dagine chor

नाशिक: शहरात सतत वाढणाऱ्या सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने मोठे पाऊल उचलले आहे. चेन स्नॅचिंगमध्ये गुंतलेल्या सराईतांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) लागू करण्याचा निर्णय घेतला असून, या कारवाईने शहरातील जबरी चोऱ्यांना आळा बसण्याची शक्यता आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक Sandeep Karnik यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा व उपनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गेल्या पाच दिवसांत तीन टोळ्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक केलेल्या सहा संशयितांपैकी दोन अल्पवयीन असल्याचे समजते.

गुन्हे शाखेच्या तपासात संशयितांच्या टोळ्यांनी एकूण २० पेक्षा अधिक चोऱ्यांचे गूढ उकलले आहे. ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झाल्यानंतर या टोळ्यांचे नेटवर्क तोडण्यात येईल आणि अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

संशयितांकडून हस्तगत मुद्देमाल

  1. किरण उर्फ दाजी छगन सोनवणे (वय ३८, रा. पेठरोड), योगेश गायकवाड (वय २८, रा. सिन्नर) आणि सोमनाथ खलाटे (रा. बीड):

जप्त मुद्देमाल: २२ तोळे सोनं (१८,११,८०० रु.), दुचाकी (७०,००० रु.), गावठी पिस्तूल (३०,५०० रु.)

उकललेले गुन्हे: २०

  1. सचिन केशव पाटील (वय २८, रा. आनंदवली), अनिल सुभाष चिंतामणी (वय २९, रा. वडाळा, श्रीरामपूर):

जप्त मुद्देमाल: ५६.५५ ग्रॅम सोनं (४,८१,००० रु.), दुचाकी

उकललेले गुन्हे: ४

  1. दोन अल्पवयीन मुले:

जप्त मुद्देमाल: ७७.५५० ग्रॅम सोनं (७,१८,४०० रु.), दुचाकी

सोनसाखळी चोरीत बाहेरील टोळ्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयितांच्या संपर्कातील सराफ व्यावसायिकांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. ‘मोक्का’च्या कारवाईने गुन्हेगारांची साखळी तोडण्याचे काम वेगाने सुरू असून भविष्यात अशा चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटेल, असा पोलिसांचा विश्वास आहे.