गुन्हेशाखा युनिट क्र. २ नाशिकची उल्लेखनीय कामगिरी: चोरीची मोपेड जप्त, आरोपीला अटक
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik शहरातील गुन्हेशाखा युनिट क्र. २ च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून चोरीची हिरो होंडा प्लेझर मोपेड जप्त केली असून, आरोपीला अटक केली आहे.
गुन्हेशाखा युनिट क्र. २ मधील पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, महाराजा लोणी स्पंज डोसा हॉटेल, अंबड लिंक रोड, नाशिक येथे चोरीची मोपेड विकण्यासाठी एक इसम येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने तातडीने सापळा रचला.
सापळ्यातून सिक्रम सिंग जोगी सिंग (वय २५, रा. घरकुल योजना, अंबड, नाशिक) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेली हिरो होंडा कंपनीची प्लेझर मोपेड (किंमत १८,००० रुपये) जप्त करण्यात आली. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३८/२४ नोंदवून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, यशवंत बेडकोळी, सपोउनि राजेंद्र घुमरे, गुलाब सोनार, तसेच पोलीस कर्मचारी चंद्रकांत गवळी, सुनिल आहेर, प्रकाश महाजन, किरण आहिरराव, मनोज परदेशी, वाल्मीक चव्हाण, पोअं जितेंद्र वजीरे, प्रविण वानखेडे यांनी केली.
He Pan Wacha : Nashik : १०६ तोतया वारसदारांच्या मदतीने २ कोटींचा आर्थिक घोटाळा”