नाशिक | २ जुलै २०२५: Nashik Crime
नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी परीक्षार्थी बसवून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबईतील पवई पोलिस ठाण्यात बिहारमधील सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक कशी घडली? (Nashik Crime)
१३ मार्च २०२२ ते ४ मार्च २०२३ दरम्यान करन्सी नोट प्रेस नाशिक येथे कनिष्ठ टेक्निशियन (मुद्रण, नियंत्रण), वर्कशॉप टेक्निशियन (इलेक्ट्रीकल) आणि पर्यवेक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.
या परीक्षेसाठी काही खरे उमेदवारांनी डमी परीक्षार्थी पाठवून त्यांच्या जागी परीक्षा दिली. हे डमी उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर बनावट ITI प्रमाणपत्रे आणि डिप्लोमा सादर करून नोकऱ्या मिळवल्या.
आरोपींची नावे (सर्व बिहार राज्यातील):
- रवी रंजन कुमार
- संदीप कुमार
- शिशुपाल कुमार
- आयुष राज
- राजीव सिंग
- संदीप कुमार (दुसरा आरोपी)
- आशुतोष कुमार
या सातही आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि संगनमताने सरकारी संस्था गंडवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या झिरो एफआयआरच्या माध्यमातून मुंबईतील पवई पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, सर्व आरोपी फरार आहेत.