नाशिक : Nashik Crime News शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे नाशिक महानगरप्रमुख आणि उपनेते सुनील बागुल यांच्या समर्थकांनी आरएसएस समर्थक गजू घोडके यांच्या घरात घुसून मारहाण, तोडफोड आणि चोरी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मामा राजवाडे, सागर देशमुख व इतर २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
काय घडलं नेमकं?
गजू घोडके (RSS समर्थक आणि सराफ व्यावसायिक) यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते सुनील बागुल यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. यामध्ये त्यांनी बागुल यांनी कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा आरोप करत ईडीकडून चौकशी करण्याची मागणी केली होती.
हा व्हिडीओ व्हायरल होताच, बागुल यांच्या समर्थकांनी व्हिडीओ हटवण्यासाठी धमकी दिली. त्यानंतर ३० जून रोजी राजवाडे, देशमुख व त्यांच्या साथीदारांनी घोडके यांच्या घरात घुसून हल्ला केला. हत्यारं, विटा वापरून मारहाण, घरात तोडफोड आणि चोरी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
पोलिसांत काय म्हटलं आहे? (Nashik Crime News)
गजू घोडके यांच्या फिर्यादीनुसार –
- ३० जून रोजी काठेगल्लीत त्यांच्या घरात घुसून मारहाण केली गेली.
- ४ लाख रुपयांचे नुकसान, सोन्याची चैन आणि ₹१ लाखाची रोकड चोरीला गेली.
- जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
- आरोपींमध्ये मामा राजवाडे, सागर देशमुख, अमोल पाटील, लखन दोंदे, झुरडया, विलास सनसे यांचा समावेश असून त्यांच्यासोबत आणखी २० जण होते.
पोलीस तपास सुरू, आरोपी फरार
भद्रकाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. मामा राजवाडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. या घटनेमुळे शहरात राजकीय वातावरण तापले आहे.