नातेसंबंधाला काळीमा – Nashik मध्ये श्रमिकनगर परिसरात चुलतीवर पुतण्याकडून अत्याचार; पीडित महिलेवर मानसिक उपचार सुरू
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक : Nashik Crime News शहरातील श्रमिकनगर भागात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेस तिच्याच पुतण्याकडून अत्याचाराचा सामना करावा लागल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.
१९ जून रोजी दुपारी सुमारास, औषधांच्या गोळ्या घेत अर्धवट झोपेत असलेल्या महिलेकडे तिच्या पुतण्याने अश्लील हेतूने पाहिले. त्यानंतर त्याने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर ही बाब कोणालाही सांगू नये म्हणून त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली.
याच पाशवी कृत्यानंतर, २५ जून रोजी संशयिताने महिलेचा फोनवरून पुन्हा एकदा छळ केला आणि अश्लील भाषेत बोलून तिला पुन्हा ठार मारण्याची धमकी दिली, असे पीडितेने सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
सध्या पीडित महिला मानसिक आघातामुळे उपचार घेत आहे. पोलिसांनी संबंधित पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.