Drunk Son Murdered by Parents | Nashik Shivajinagar Murder Case | Gangapur Police FIR
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक (२८ जून २०२५): Nashik Crime News सातपूरमधील शिवाजीनगर भागात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका मद्यपी मुलाचा गळा आवळून त्याच्या आई-वडिलांनीच खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोस्टमार्टेम अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आई, वडील आणि बहिणीचा पती असे तिघे अटकेत आहेत.
खून झालेल्या व्यक्तीची माहिती: Nashik Crime News
- नाव: विशाल पाटील
- वय: अंदाजे ३५ वर्षे
- राहणार: शिवाजीनगर, सातपूर, नाशिक
घटनेचा तपशील (Incident Summary):
तक्रारदार पूजा पाटील (३४) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांचा पती विशाल पाटील २७ जून रोजी सकाळी ११ वाजता दारू पिऊन घरी आला होता. नशेच्या अवस्थेत त्याने सासरे गोकुळ पाटील, सासू शशिकला पाटील व नंदोई उमेश काळे यांच्याशी वाद घालून शिवीगाळ व मारहाण केली.
दारू पिण्यासाठी पैसे न मिळाल्याने तो घरातील भांडे विकण्याचा प्रयत्न करत असताना आई-वडिलांनी व नंदोईने त्याला रोखले आणि मारहाण केली. नंतर ओढणीने दोन्ही हात बांधून गळा आवळण्यात आला. त्याचवेळी शशिकला पाटील यांनी उशी दाबून आवाज थांबवण्याचा प्रयत्न केला, आणि विशालचा श्वास घोटून खून केल्याची कबुली पोलीस चौकशीत समोर आली आहे.
रुग्णालयात नेण्याचा नाटक आणि पोलिसांची कारवाई:
खून झाल्यानंतर काही तास मृतदेह घरात ठेवून रात्री ८ वाजता विशालला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६६/२०२५ नोंदवण्यात आला असून, तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे.