नाशिक (Nashik Theft Case): Nashik Crime News मालकाच्या कारमधून तब्बल दहा लाख रुपये रोख चोरी करणाऱ्या दोन नोकरांना अखेर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने मंगरूळ फाटा परिसरात सापळा रचून अटक केली. संशयितांकडून दुचाकी आणि एकूण ₹10.60 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चोरीचा प्रकार – कारमधील रोकड लंपास (Nashik Crime News)
फिर्यादी विनोद अशोक कंदोई यांच्या म्हणण्यानुसार, ११ जून रोजी त्यांच्या कारमध्ये ठेवलेली ₹10 लाखांची रोकड चालक जगतपाल बुधाराम लालर याने त्याचा साथीदार सुशिल शिशपाल राव यांच्या मदतीने चोरी केली होती. दोघेही मूळचे सोनेडी, जिल्हा हनुमानगड (राजस्थान) येथील रहिवासी असून, सध्या शिवाजीनगर, टाकळी रोड येथील दत्ता सोसायटीत राहत होते.
मंगरूळ फाट्यावर सापळा आणि अटक
- पोलीस तपासात दोघे चाळीसगावहून दुचाकी (MH 15 JS 1478) वरून चांदवडमार्गे नाशिककडे येत असल्याची माहिती मिळाली.
- त्यानुसार मंगरूळ फाटा परिसरात सापळा रचण्यात आला, आणि पोलिसांच्या कारवाईत दोघांनाही अटक करण्यात आली.
- चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर ₹10.60 लाख किमतीचा रोख व दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तपासात सहभागी अधिकारी
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पुढील अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता:
- सहाय्यक निरीक्षक हिरामण भोये
- उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे
- हवालदार महेश साळुंके, रोहिदास लिलके, कैलास चव्हाण
- अंमलदार रमेश कोळी, उत्तम पवार, धनंजय शिंदे, राहुल पालखेडे, नितीन जगताप आदी