Breaking Nashik Cyber Crime | हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर करून बँक खात्यातून 1 लाखांची फसवणूक

Nashik Cyber ​​Crime | Bank account defrauded of Rs 1 lakh by misusing lost mobile phone

नाशिक: Nashik Cyber Crime हरवलेल्या मोबाईलचा वापर करत सायबर भामट्यांनी बँक खात्यावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या सायबर गुन्ह्यात फसवणूकदारांनी फोन पे व युपीआयच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपये लंपास केले असून, आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या प्रकरणी राजाराम हरी नेटारे (रा. तिरुपतीनगर दसक, जेलरोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा मोबाईल हरवला होता. याच मोबाईलचा गैरवापर करून रविवार, 15 जून रोजी भामट्यांनी त्यांच्या ICICI बँकेच्या बिटको शाखेतील खात्यावरून पैसे काढले.

Nashik Cyber Crime

गहाळ मोबाईल क्रमांक हे खाते युपीआय व फोन पे सेवांशी लिंक असल्याने, OTP आणि अ‍ॅप्सचा वापर करत फसवणूकदारांनी एक लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केली. सदर प्रकार लक्षात येताच नेटारे यांनी पोलिसांत धाव घेतली.

या सायबर फसवणुकीचा तपास हवालदार सुळे करत आहेत.