शहर हादरले: १० दिवसांत ५ मोठ्या घरफोड्या
Nashik Daylight House Break-ins Surge – शहरात गेल्या दहा दिवसांत पाच मोठ्या घरफोडीच्या (Nashik Daylight House Break) घटनांनी नागरीक भयभीत झाले आहेत. दिवसाढवळ्या सर्रास घरफोड्या होत असल्याने चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला जात असून, काही प्रकरणांचा तपास संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik Daylight House Break : अंबडमध्ये सराफ दुकानावर दरोडा, माजी नगरसेवकाच्या घरातही घरफोडी
अंबड येथील महालक्ष्मी नगरमध्ये असलेल्या श्री ज्वेलर्स सराफ दुकानात गेल्या आठवड्यात चोरट्यांनी बंदुकीच्या धाकावर दरोडा घातला. या घटनेचा तपास सुरू असतानाच नाशिक रोडच्या शिखरेवाडीत माजी नगरसेवकाच्या घरात मोठी घरफोडी करण्यात आली. चोरट्यांनी तब्बल २८ तोळे दागिने आणि १६.५ लाख रुपये रोख रक्कम लंपास केली. या घटना उघडकीस आल्यानंतर शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नागरिकांमध्ये संताप: पोलिस तपास संथ (Nashik Daylight House Break)
नाशिक शहरातील वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पोलिसांचा तपास संथ असल्याने चोरट्यांना अधिक धाडस मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. मागील अनेक घरफोड्यांचे गूढ अद्याप उकलले नसल्याने चोरटे निर्धास्त बनले आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली आहे.
Nashik Daylight House Break : चोरटे आधी करतात रेकी, मग गुन्हा
गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चोरटे आधी रेकी करत असल्याचे समोर आले आहे. घरफोडी करण्यापूर्वी ते घरातील व्यक्तींच्या हालचाली, त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा, परिसरातील रहदारी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या यासंबंधी सविस्तर माहिती घेतात. त्यामुळे पोलिसांना तपास करताना अडचणी येत आहेत.
परराज्यातील चोरट्यांचा संबंध; पोलिसांसमोर नवे आव्हान
नाशिकमधील काही मोठ्या घरफोड्यांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथील चोरटे सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे चोरटे स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने चोरी करून, ऐवज घेऊन लगेचच आपल्या राज्यात पळ काढतात. त्यामुळे पोलिसांसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरत आहे.
नाशिकमध्ये घरफोडीच्या प्रमुख घटना (फेब्रुवारी २०२५)
- १० फेब्रुवारी – पेठ रोडवरील बिअर बारमधून ७० हजारांचे मद्य आणि रोकड चोरी.
- ११ फेब्रुवारी – कोणार्कनगर, आडगाव येथे भरदिवसा घरफोडी; ४० हजारांचे दागिने चोरी.
- १५ फेब्रुवारी – श्रीकृष्णनगर, मखमलाबाद येथे बंगल्यात घरफोडी; ६.४० लाखांचे दागिने व रोख लंपास.
- १७ फेब्रुवारी – अंबड येथे सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा; १६ लाखांहून अधिक किमतीचे दागिने चोरी.
- १९ फेब्रुवारी – नाशिक रोड, शिखरेवाडी येथे माजी नगरसेवकाच्या घरात २८ तोळे दागिने आणि १६ लाखांची रोकड चोरी.
सीसीटीव्ही आणि ‘लोकल सुरक्षित नाशिक’ अॅपचा उपयोग
परराज्यातील आणि परजिल्ह्यातील चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. सध्या नाशिक शहरात २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, आणखी ५०० कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. तसेच, ज्या भागात घरफोडीच्या घटना घडतात, त्या भागातील माहिती ‘लोकल सुरक्षित नाशिक’ या अॅपवर अपलोड करून त्या भागात गस्त वाढवली जात आहे.
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव म्हणतात…
“परराज्यातील आणि परजिल्ह्यातील चोरटे स्थानिक सराईत गुन्हेगारांना हाताशी धरून गुन्हे करत आहेत. मात्र, सीसीटीव्ही आणि पोलीस गस्त यामुळे ते लवकरच जाळ्यात अडकतील.”
नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची अधिक तत्परता आवश्यक आहे. नागरिकांनीही सतर्क राहून घरातील सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. लवकरच या प्रकरणांमध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.