ग्रामविकास विभागाच्या मान्यतेने नाशिक जिल्हा परिषदेच्या संवर्गासाठी

Screenshot 2024 09 05 111927

MBC मराठी : ग्रामविकास विभागाच्या मान्यतेने नाशिक जिल्हा परिषदेच्या संवर्गासाठी दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध जाहिरातीप्रमाणे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलद शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद नाशिक पदभरतीतील सात संवर्गातील नियुक्तीचे आदेश आज निर्गमित केले. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखन (उच्च श्रेणी), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी(शिक्षण) या पदांचे नियुक्त आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांच्या हस्ते देण्यात आले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील पदांसाठी आय बी पी एस कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात आली. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक ३, लघुलेखन (उच्च श्रेणी)१, कनिष्ठ सहाय्यक (लेखा)५, कनिष्ठ लेखाधिकारी१, कनिष्ठ यांत्रिकी१, कनिष्ठ आरेखक२, विस्तार अधिकारी(शिक्षण)७
इतक्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सहायक(लिपिक), कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), औषध निर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गांच्या कागदपत्रांची पडताळणी अंतिम टप्प्यात असून गैरहजर उमेदवारांना ३ वेळा संधी देण्यात येऊन अनुपस्थित उमेदवार वगळून आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर जिल्हा निवड समितीच्या मान्यतेस्तव नस्ती मा. अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे निवड समितीच्या मान्यतेनंतर सदर निवड यादीतीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

Leave a Reply