Nashik drug peddler : नाशिक: ड्रग्ज पेडलर सलमान फालके चरससह पोलिसांच्या जाळ्यात

Murder

नाशिक: ड्रग्ज पेडलर Drug peddler सलमान फालके पोलिसांच्या जाळ्यात, चरससह अटक

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक शहरात पुन्हा एकदा ड्रग्ज विरोधी कारवाईचा फड उभा राहत आहे. मुंबईतील कुख्यात ड्रग्ज पेडलर drug peddler सलमान शकिल फालके (३२, रा. मुंब्रा) याला नाशिक पोलिसांनी मध्यरात्रीच्या विशेष कारवाईत जाळ्यात पकडले. सलमान शहरात चरस विक्रीसाठी आला असताना मुंबईनाका पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ४९ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे.

गोपनीय माहिती आणि मध्यरात्रीची कारवाई

मुंबई नाका पोलिस ठाण्यातील अंमलदार फरीद इनामदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सलमान नाशिकमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मध्यरात्री गडकरी चौक आणि सारडा सर्कल परिसरात सापळा रचला. तीन वाजताच्या सुमारास सलमानला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली.

यापूर्वीही अटक

सलमान याला २०२३ साली एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक झाली होती. वडाळागाव भागातील ‘छोटी भाभी’ नावाच्या कुख्यात ड्रग्ज विक्रेत्याला तो अमली पदार्थ पुरवठा करत होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची कडी घट्ट करत त्याला मुंबईत अटक केली होती.

ड्रग्जविरोधी मोहिमेला यश

पोलिसांनी चरस तस्करी प्रकरणी सलमानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाशिक शहरातील वाढत्या अमली पदार्थांच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरत आहे. शहरातील तरुणांना ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांची सतर्कता आणि कार्यक्षमता कौतुकास्पद आहे.