नाशिक | प्रतिनिधी
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik Guardian Minister : नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ( Nashik Guardian Minister )नियुक्तीवरचा तिढा अखेर सुटण्याची चिन्हे आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात यासंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच अधिकृत निर्णय जाहीर करू शकतात.
Nashik Guardian Minister: महाजन यांना संधी? कोकाटे स्पर्धेतून बाहेर!
पालकमंत्री पदाच्या स्पर्धेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिक न्यायालयाने त्यांना सदनिका घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या सदस्यत्वावर आणि मंत्रीपदावर टांगती तलवार आहे. परिणामी, पालकमंत्री शर्यतीतून त्यांची माघार निश्चित झाली आहे. त्याचा थेट फायदा गिरीश महाजन यांना होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
२०२७ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पालकमंत्र्यांची तातडीची गरज(Nashik Guardian Minister )
नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, त्याच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन आवश्यक आहे. मात्र, पालकमंत्री नसल्याने अनेक निर्णय प्रलंबित राहिले आहेत. विकासकामे गतीने व्हावीत, यासाठी पालकमंत्री नियुक्ती लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी स्थानिक जनतेतून होत आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय महत्त्वाचा
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात स्पर्धा आहे. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने महाजन यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला असल्याचे सूत्रांकडून समजते. एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या राजकीय भवितव्यावर लवकरच निर्णय होईल, आता फक्त अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे!