Nashik : नाशिक शहरात अवैध वाहतूक व अतिरिक्त भार भरून शासनाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईसाठी नाशिक शहर गुन्हे शाखेने विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत दोन एकाच नंबर असलेल्या आयशर ट्रकसह २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाय व सहायक Nashik पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली Nashik गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ च्या पथकाने ही कारवाई केली.
Nashik गुन्हे शाखेच्या पोहवा नाझीमखान पठाण यांना गुप्त माहिती मिळाली की, दोन एकाच क्रमांकाचे आयशर ट्रक एक्सलो पॉईंटहून लेस्की पॉकेटकडे येणार आहेत. माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला.
वाहने जप्त, चालक अटकेत
ऑपरेशनदरम्यान, एमएच ०४ के ७११४ या क्रमांकाच्या दोन वेगवेगळ्या ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये रो मटेरियल भरलेले आढळले. वाहनचालक अताउल्ला बैतुल्ला चौधरी (रा. विराटनगर, अंबड लिंक रोड, नाशिक) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दोन्ही ट्रकांवर एकच क्रमांक असलेली नंबर प्लेट बसवून अतिरिक्त भार वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले.
२५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
सदर कारवाईत २५ लाख रुपये किमतीचे दोन ट्रक जप्त करण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८(२), ३४१ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई Nashik पोलीस आयुक्त संदीप कर्णिक , उपआयुक्त प्रशांत बच्छाय आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोउनि चेतन बिवंत, पोहवा प्रविण वाघमारे, प्रशांत मरवल, नाझीमखान पठाण, प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे, विशाल देवरे, अमोल कोष्टी व समाधान पवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
गुन्ह्याचा पुढील तपास अंबड पोलीस ठाणे करीत आहे.