मनमाडमध्ये अपहरणाचा थरार: बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न उधळला; एक अटकेत, दोन पळाले
मनमाड (जि. नाशिक) – Nashik Kidnapping News नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील सिकंदरनगर परिसरात रविवारी सकाळी घडलेली पाचवर्षीय बालिकेच्या अपहरणाची घटना संपूर्ण शहरात खळबळ माजवणारी ठरली. तीन परप्रांतीय तरुणांनी चॉकलेटचे आमिष दाखवत बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जागरूक नागरिकांच्या तत्परतेमुळे हा डाव उधळून लावण्यात यश आले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
घटनेचा तपशील : अपहरणाचा प्रयत्न वाचला Nashik Kidnapping News
रविवार, दिनांक २२ रोजी सकाळी पाच वर्षांची बालिका दूध घेण्यासाठी रिक्षा स्टॉपजवळील दूध डेअरीवर गेली होती. यावेळी तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत तिघा अनोळखी तरुणांनी पळवण्याचा प्रयत्न केला.
- काही जागरूक नागरिकांनी ही संशयास्पद हालचाल पाहताच तत्काळ हस्तक्षेप केला
- आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला
- एक संशयित तरुण पकडला गेला, तर इतर दोघे फरार झाले
- पकडलेल्या तरुणाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले
अटक व पुढील तपास
पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाची ओळख नबीन ज्योतीदास (वय २८, राहणार आसाम) अशी पटवली असून, त्याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक विजय करे व सहायक निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नागरिकांची सतर्कता ठरली उपयोगी
या घटनेत नागरिकांची तत्परता आणि समाजाची सजगता महत्त्वाची ठरली. जर वेळेवर हस्तक्षेप झाला नसता, तर ही घटना गभीर व अघटित होऊ शकली असती. त्यामुळे अशा प्रकारांबाबत सतत जागरूक राहणे गरजेचे आहे.