जोपुळ रोड येथील घटना; पोलिसांकडून तिघा मित्रांना अटक
Nashik latest crime updates: शहरातील जोपुळ रोड परिसरात शनिवारी रात्री एका हळदी समारंभात नाचण्यास नकार दिल्याने २३ वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. रवी सोमनाथ गुंबाडे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
हळदी समारंभात घडली हिंसक घटना
रवी गुंबाडे हा शनिवारी रात्री जोपुळ रोड येथील बाजार समितीच्या गेट समोर आयोजित हळदी समारंभाला गेला होता. समारंभात उपस्थित काही मित्रांनी रवीला नाचण्यासाठी सांगितले, मात्र त्याने नकार दिला. या कारणावरून त्याच्यामध्ये आणि मित्रांमध्ये वाद झाला.
धारधार शस्त्राने हल्ला, रवीचा जागीच मृत्यू
वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले आणि एका क्षणी तिघा मित्रांनी रवीवर धारधार शस्त्राने हल्ला चढवला. वार वर्मी बसल्याने रवीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तिघा संशयितांना पोलिसांकडून अटक
या प्रकरणात पिंपळगाव बसवंत पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे:
- हेमंत परसराम जाधव
- जनार्दन ज्ञानेश्वर गांगुर्डे
- रमेश मुरलीधर शेखरे
(सर्व राहणारे – अंबिका नगर, पिंपळगाव बसवंत)
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले आणि पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.