धुलीवंदन महत्त्व: नवसाला पावणारे ‘बाशिंगे वीर’ आणि ‘दाजीबा वीर’
नाशिकमध्ये शतकानुशतके सुरू असलेली ऐतिहासिक परंपरा
Nashik Legendary Dajiba Veer : धुलीवंदनाच्या दिवशी, फाल्गुन वद्य प्रतिपदेला, नाशिक शहरात दाजीबा वीराची भव्य मिरवणूक काढली जाते. देवी-देवतांचे अवतार धारण करून पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक जुने नाशिक परिसरातून मार्गस्थ होते. शंभर वर्षांहून अधिक जुनी ही परंपरा पिढ्यान्पिढ्या जपली जात आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
दाजीबा वीर: नवसाला पावणारा देव
भाविकांमध्ये दाजीबा वीर नवसाला पावणारा असल्याची श्रद्धा आहे. मिरवणुकीदरम्यान, घरोघरी जाऊन या वीराची पूजा केली जाते. धूलिवंदनाच्या दिवशी सवाद्य मिरवणुकीसोबत गोदाकाठील यात्रेचेही दर्शन घडते.

दाजीबा वीर मिरवणुकीचे वैशिष्ट्ये (Nashik Legendary Dajiba Veer)
बाशिंगे वीरांचा पारंपरिक वेशभूषा
- भरजरी वस्त्रांनी सजलेले डोके
- कानात सोन्याच्या पगड्या
- गळ्यात सोन्याच्या सऱ्या
- हातात सोन्याचे कडे
- पायात मारवाडी जोडे
- कमरेला धोतर
दुपारी दोन वाजता सुरू झालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता पूर्ण होते. मार्गावर भाविक वीराची पूजा करून नवस मागतात. यावेळी फुलांचे हार, नारळ, उदबत्ती, बाशिंगाचा जोड अर्पण केला जातो.
दाजीबा वीरांची आख्यायिका
जानोरी गावातील ऐतिहासिक घटना
जानोरी गावात एक गवळी राहत होता, जो खंडेरायाचा भक्त होता. लग्नानंतर हळद लागलेल्या अवस्थेतच तो दूध घालण्यासाठी गेला. वाटेत अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा प्राण घेतला. याच घटनेनंतर गावात वाद्ये वाजू लागली, आणि त्याच्या आत्म्याने देव रूप धारण करून दर्शन दिले.
त्यामुळे फाल्गुन वद्य प्रतिपदेला दरवर्षी दाजीबा वीराची मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू झाली.

नाशिकमधील तीन दाजीबा वीर
नाशिकमध्ये एकूण तीन दाजीबा वीर आहेत—
- विनोद बेलगावकर यांच्याकडे
- कै. दत्तात्रय भागवत यांचे चिरंजीव प्रवीण भागवत (पंचवटी)
- यसोबा महाराज (मोरे परिवार, घनकर लेन)
तळोदा येथे वीरांची समाधी
दिंडोरी तालुक्यातील तळोदा येथे बाशिंगे वीरांची समाधी आहे. दरवर्षी होळीच्या रात्री १२ वाजता येथे विशेष पूजा केली जाते.
धुलीवंदनाचा अनोखा उत्सव: ३०० वर्षांची परंपरा
नाशिकमध्ये गेल्या ३०० वर्षांपासून धुलीवंदनाच्या दिवशी ही मिरवणूक काढली जाते. कुटुंबातील पूर्वजांचे टाक खोबऱ्याच्या वाटीत टाकून वाजतगाजत मिरवले जाते. दाजीबा वीराच्या दर्शनाने सर्व विघ्ने दूर होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.
“श्री दाजीबा महाराज की जय!”
|| जय श्रीराम ||
संकलन: मनाली गर्गे