Nashik : नाशिकजवळ बिबट्याचा मृतदेह विहिरीत, घातपाताची शक्यता

Vanapranyachya hallayat mrutyu zhalyas ata 25 lakhanchi aarthik madat: Janun ghya shasanachya yojananchi savistar mahiti

Latest News: नाशिक शहराजवळील म्हसरुळ शिवारात एका विहिरीत नर बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ माजली आहे. या बिबट्याच्या शरीराभोवती तारेने वजनदार लोखंडी वस्तू बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळला आहे. यामुळे वन अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

बिबट्या अंदाजे पाच ते सहा वर्षांचा असून, मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यावर तरंगत होता आणि परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली होती. बिबट्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि विच्छेदनासाठी वन विभागाच्या म्हसरुळ केंद्रात हलविण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली थोरात यांनी शवविच्छेदन केले असून, काही अवयवांचा ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे.

प्रथमदर्शनी या मृत्यूमध्ये संशय असल्याचे वन विभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय तज्ञांनी नमूद केले आहे. मृतदेहाच्या सर्व अवयवांवर शारीरिक हानीचे काही ठोस पुरावे आढळले नसले तरी, मृत्यूचे खरे कारण व्हिसेरा तपासणीनंतर स्पष्ट होईल. शिकार झाल्याचे सिद्ध झाल्यास गुन्हा वन्यजीव कायद्यांतर्गत नोंदवला जाईल.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, बिबट्याचा मृत्यू पाण्यात बुडून न होता इतर कारणांमुळे झाल्याचा संशय आहे, कारण शरीराभोवती तार बांधलेली होती.