नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी लवकरच स्थानिक पातळीवर बैठक, संशयास्पद भूसंपादनाची चौकशी

Nashik: Local level meeting soon for Kumbh Mela preparations, inquiry into questionable land acquisition

नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी चार-पाच वर्षाचा कालावधी लागतो. आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी केवळ दोन वर्षाचा कालावधी राहिला आहे. नियोजनाला उशीर होत असल्याने त्यास गती देण्याकरिता पुढील आठवड्यात सिंहस्थाची स्थानिक पातळीवर विस्तृत बैठक होणार आहे. तसेच साधुग्रामसाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांऐवजी काही विशिष्ट घटकांना • भूसंपादनापोटी कोट्यवधीचा मोबदला दिला गेला. याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. याबाबतची माहिती आगामी कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. कुंभमेळ्याच्या तयारीचा अभ्यास करण्यासाठी अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार आहेत. कुंभमेळा नियोजनास विलंब होत असल्याची भावना प्रशासकीय वर्तुळातून उमटत आहे. या कामांना विलंब व्हायला नको म्हणून सर्व विषयांवर तातडीने विस्तृत स्वरुपाची बैठक घेतली जाणार आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

साधुग्रामसाठी संपादीत केलेल्या जागांचा मोबदला देणे आवश्यक आहे. मधल्या काळात भूसंपादनापोटी दुसऱ्या लोकांना पैसे दिले गेले. ज्या जागेची गरज नाही, त्या जागेचे पैसे दिले. साधुग्रामच्या जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यांना मात्र पैसे दिले गेले नाही. नियमाला बगल देत ज्यांना भूसंपादनाचे कोट्यवधी रुपये दिले गेले, त्यांना शोधून काढले जाईल. महानगरपालिकेच्या संशयास्पद भूसंपादनाची चौकशी पुढील काही दिवसात होईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे महाजन यांनी संगितले.

संक्रांतीनंतर पालकमंत्रीपदाचा निर्णय मकर संक्रातीनंतर पालकमंत्रीपदांचा निर्णय राज्यात पालकमंत्र्यांची घोषणा व्हायला उशिर झाला असला तरी मकरसंक्रांतीनंतर याबाबत निर्णय होईल, असे महाजन यांनी म्हटले आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांनी आपण काही ती सूत्रे घ्यायला आलेलो नाही, असे मिश्किलपणे सांगितले.