नाशिक : Nashik Monsoon Update नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली असून, 1 जुलैपर्यंत सरासरी 222.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद मासिक सरासरीच्या 127.5% इतकी अधिक असून, मालेगाव वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये शंभरी ओलांडणारा पाऊस झाला आहे.
धरण साठा वाढला, त्र्यंबकेश्वर ‘हायअलर्ट’ वर (Nashik Monsoon Update)
जिल्ह्याच्या बहुतांश भागात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर, दारणा, पालखेडसह अनेक धरणांमध्ये पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. याचा फायदा फक्त जिल्ह्यालाच नव्हे तर मराठवाड्यातील जायकवाडी धरणालाही झाला असून, सुमारे 8 टीएमसी पाणी जायकवाडीमध्ये दाखल झाले आहे.
तालुकानिहाय पावसाचे चित्र (1 जून – 1 जुलै 2025)
तालुका | पावसाची नोंद (मिमी) | सरासरीच्या टक्केवारीने |
---|---|---|
त्र्यंबकेश्वर | 662.5 | 208% |
पेठ | 496.6 | — |
इगतपुरी | 458.4 | 92.5% |
सुरगाणा | 370.0 | — |
दिंडोरी | 279.9 | — |
नाशिक | 257.9 | 167% |
निफाड | 182.7 | — |
चांदवड | 178.8 | — |
कळवण | 174.4 | — |
सिन्नर | 164.0 | — |
येवला | 155.0 | — |
नांदगाव | 106.0 | — |
देवळा | 101.0 | — |
बागलाण | 131.5 | — |
मालेगाव | 90.8 | फक्त 85.6% |
नाशिक शहरात पावसाचा विक्रम मोडला
मेरी वेधशाळेच्या नोंदीनुसार नाशिक शहरात 1 जून ते 1 जुलैदरम्यान 257.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधी जून महिन्यात 2017 मध्ये 249.4 मिमी पावसाची नोंद झाली होती, मात्र 2025 मध्ये हा विक्रम मोडीत काढण्यात आला आहे.
धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
गंगापूर, दारणा आणि पालखेड समूहातील धरणांमधून नांदूरमध्यमेश्वरमार्गे विसर्ग सुरू असून, या प्रवाहातून पाणी मराठवाड्याकडे वेगाने झेपावत आहे. आतापर्यंत 8 टीएमसी पाणी जायकवाडीला पोहोचले आहे.