Nashik News : नाशिक जिल्ह्यातील 4 हजार होमिओपॅथी डॉक्टरांचा संप आंदोलनात सहभाग

Nashik News: 4 thousand homeopathy doctors in Nashik district participate in strike movement

Nashik News

मुंबई – राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील तब्बल चार हजार होमिओपॅथी डॉक्टर संपावर गेले असून, मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला आहे. संपूर्ण राज्यभरातून जवळपास एक लाख होमिओपॅथी डॉक्टर हे या आंदोलनाचा भाग आहेत.

होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेला स्थगिती मिळाल्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि माजी अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे यांनी सांगितले की, “मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे.”

राज्यभरातील होमिओपॅथी डॉक्टरांचा संताप : अॅलोपॅथीवर प्रॅक्टिसला विरोध (Nashik News)

२०१४ मध्ये राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाचा CCMC कोर्स पूर्ण केल्यानंतर अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी दिली होती. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे गेले दहा वर्ष डॉक्टरांची नोंदणी रखडली होती. १५ जुलै २०२५ पासून सरकारने निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली, मात्र अॅलोपॅथी संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला.

याच पार्श्वभूमीवर १६ जुलैपासून होमिओपॅथी डॉक्टरांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. नाशिकमधून डॉ. स्वप्नील खैरनार (जिल्हाध्यक्ष), डॉ. अमोल वाझे (शहराध्यक्ष) यांच्यासह चार हजार डॉक्टर आंदोलनात उतरले आहेत.

आरोग्य धोका? IMA आणि MARDA संघटनांचा विरोध

Indian Medical Association (IMA) आणि Maharashtra Association of Resident Doctors (MARD) यांसारख्या अॅलोपॅथी संघटनांनी सरकारला पत्र पाठवून असा इशारा दिला आहे की, “होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्रात प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिल्यास रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

संपाचा परिणाम : रुग्णसेवा ठप्प

आंदोलनादरम्यान अनेक डॉक्टरांनी रुग्ण तपासणी बंद केली असून, “नवीन एकही रुग्ण तपासण्यात आलेला नाही. आम्ही पूर्णपणे संपात सहभागी आहोत,” असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.