Nashik News | महात्मा फुले कलादालनात सुरू होणार टिंकरिंग लॅब – 4 वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

Nashik News | Tinkering Lab to start at Mahatma Phule Art Gallery – Four years of waiting finally come to an end

नाशिक (Nashik News): नाशिकमधील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली टिंकरिंग लॅब (Tinkering Lab in Nashik) अखेर सुरू होणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) महात्मा फुले कलादालनात (Mahatma Phule Kaladalan) ही लॅब स्थापन होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.

शोध आणि सर्जनशीलतेला चालना देणारी केंद्र शासनाची योजना

टिंकरिंग लॅब ही ‘अटल इनोव्हेशन मिशन’ (Atal Innovation Mission – AIM) अंतर्गत चालवली जाणारी योजना असून, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM Education) विषयातील सर्जनशीलता आणि संशोधक वृत्ती वाढवण्यासाठी ही लॅब उभारली जाते.

या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग, इलेक्ट्रॉनिक्स, 3D प्रिंटिंग, शिवणकाम आदींविषयी प्रयोग करता येतील. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे व्यासपीठ म्हणून ही लॅब काम करेल.

२५ लाखांचे साहित्य अखेर वापरात (Nashik News)

जागेअभावी तब्बल २५ लाखांचे प्रयोग साहित्य धूळ खात पडून होते. मात्र आता अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी महात्मा फुले कलादालनाची जागा निश्चित केली असून आयुक्त मनिषा खत्री यांनी त्यावर अंतिम निर्णय दिला आहे. त्यामुळे ही लॅब लवकरच कार्यरत होणार आहे.

‘वन अपोन’ संस्थेशी करार – विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी

नाशिक मनपाने या लॅबच्या माध्यमातून आपल्या शाळांतील इयत्ता ६वी ते १०वीतील विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञान व संशोधन शिक्षण मिळावे याकरता ‘वन अपोन’ (One Upon Foundation) या संस्थेसोबत करार केला आहे. लॅब सुरु झाल्यानंतर या उपक्रमाचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.

स्थान निश्चितीचा प्रवास

टिंकरिंग लॅबसाठी आकाशवाणी टॉवरमधील सभागृह महात्मा फुले कलादालन हे दोन पर्याय होते. अखेरीस महात्मा फुले कलादालनाची जागा निवडण्यात आली असून लवकरच लॅबचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.