Nashik NMC : नाशिकमध्ये विनापरवानगी रस्ता खोदणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई

Clash Between Local and Outsourced Officers

Nashik NMC: नाशिक शहरात रस्ता खोदण्याचे प्रमाण वाढल्यामुळे महापालिकेने दणक्यात कारवाई सुरू केली आहे. अनेक ठिकाणी नळ कनेक्शन, पाइपलाइन लीकेज आणि अन्य कामांसाठी रस्ते खोदले जात होते, पण हे काम मनपाच्या परवानगीशिवाय केल्यास आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी संजय अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, “मनपाच्या परवानगीशिवाय रस्ता खोदल्यास गुन्हा दाखल होईल आणि दंड आकारला जाईल.” ते पुढे म्हणाले, “या नियमामुळे रस्त्यांचे आयुष्यमान वाढेल आणि शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर होणारा दबाव कमी होईल.”

रस्ता खोदण्यासाठी संबंधित विभागाची पूर्वपरवानगी घेणं अनिवार्य असणार आहे. हे परवाने खास करून नळ कनेक्शन, पाइपलाइन कामे किंवा इतर शासकीय योजना राबवताना आवश्यक असतात. यापूर्वी एक वर्षात २५ जणांवर विनापरवानगी रस्ता खोदल्याबद्दल कारवाई केली गेली आहे.

या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास नाशिक शहरात रस्त्यांची स्थिती सुधारणार असून, नागरिकांना त्याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.