एरंडवाडी परिसरात दारू पार्टीतून हत्याकांड
नाशिक: पंचवटीतील पेठफाटा परिसरातील एरंडवाडीजवळ एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह संशयास्पदरीत्या (Suspicious Death)आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव शांतीलाल बरमान (रा. बोरगड) असे असून, पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Suspicious Death आरोपी संतोष आहिरे पोलिसांच्या ताब्यात
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शांतीलाल बरमान हा वॉचमन म्हणून कार्यरत होता आणि तो मंगळवार सकाळपासून बेपत्ता होता. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपासादरम्यान, संतोष आहिरे (३१, रा. एरंडवाडी) याला ताब्यात घेतले आहे. संतोष याने शांतीलालसोबत दारू पिताना वाद झाल्यानंतर दगडाने डोक्यावर वार करून त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे.
घटनास्थळी पोलीस यंत्रणांची तत्काळ कारवाई
या घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि गुन्हे शोधपथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, श्वान पथक आणि गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन संशयिताचा शोध सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार, शांतीलालच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या, त्यामुळे हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील कारवाई सुरू आहे.