Nashik Weather Alert | नाशिक बातमी | धरणांमधून पाण्याचा विसर्ग
नाशिक Nashik Rain Update: नाशिक शहर आणि जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार संततधार पावसाने हजेरी लावली असून, आतापर्यंत २९.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत, तर १३ प्रमुख धरणांमधून सतत विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला हंगामातील पहिला मोठा पूर आला आहे. गंगापूर धरणातून विसर्ग ५,१८६ क्यूसेकपर्यंत पोहोचल्याने होळकर पुलाखालील पाण्याचा प्रवाह वाढला असून, दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे.
यलो अलर्ट आणि हवामान विभागाचा अंदाज (Nashik Rain Update)
हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासह कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात १० जुलैपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, तसेच काही भागात वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
धरणांमधून विसर्ग वाढतच… | Nashik Dam Water Release
नाशिक जिल्ह्यातील १३ धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे:
- दारणा – ११,४५६ क्यूसेक
- गंगापूर – ५,१८६ क्यूसेक
- नांदूरमध्यमेश्वर – ३९,१७२ क्यूसेक
- भाम – ५,२८३ क्यूसेक
- पालखेड – २,०३४ क्यूसेक
- भोजापूर, भावली, वाकी, वालदेवी, आळंदी, काश्यपी, मुकणे इत्यादी धरणांतूनही विसर्ग सुरू आहे.
गंगापूर धरण सध्या ६०% क्षमतेने भरलेले, तर भाम, भावली, केळझर, हरणबारी, भोजापूर, वालदेवी ही धरणे पूर्णपणे भरून वाहत आहेत.
गोदावरीला मोठा पूर | Godavari Flood Situation in Nashik
- गंगापूर धरणातून ४२,००० क्यूसेक,
- दारणा धरणातून ६२,५१५ क्यूसेक,
- कडवा धरणातून ६,४५९ क्यूसेक पाणी सोडले गेले आहे.
- एकूण मिळून नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यांतून जवळपास १८ टीएमसी पाणी जायकवाडीकडे रवाना झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरण साठा (टक्केवारीनुसार)
धरण नाव | साठा (%) |
---|---|
भाम | 100 |
भावली | 100 |
वालदेवी | 100 |
मुकणे | 70.95 |
गंगापूर | 59.48 |
दारणा | 61.88 |
काश्यपी | 81.70 |
नांदूरमध्यमेश्वर | 81.71 |
पालखेड | 52.37 |
वाकी | 84.27 |
आळंदी | 94.85 |
करंजवण | 51.00 |
पुणेगाव | 75.32 |
तिसगाव | 25.49 |
ओझरखेड | 44.27 |
वाघाड | 71.07 |
चणकापूर | 46.72 |
नाग्यासाक्या | 18.64 |
जायकवाडीला रवाना झालेले पाणी – 18 टीएमसीहून अधिक |
राज्यात १९ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
पुढील पाच दिवसांत मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, कोल्हापूर, जळगाव, धुळे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या गोदावरी, दारणा, गिरणा, वैतरणा, कृष्णा, कोयना, भीमा, मुळा, मुठा, इंद्रायणी यांसारख्या प्रमुख नद्या दुथडी वाहू शकतात.