History of Nashik Ram Rathotsav : नाशिकमध्ये राम भक्तीचा महासागर; रथोत्सवात हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

Nashik Ram Rathotsav

कामदा एकादशी निमित्त राधाचे दर्शन आणि श्रीराम रथोत्सव भव्य थाटात साजरा

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik Ram Rathotsav – गोदाघाट परिसरात मंगळवारी रात्री रामभक्तांचा महासागर उसळला होता. कामदा एकादशी निमित्त राधाचे दर्शन घेण्यासाठी आणि श्री काळाराम मंदिरातून निघालेल्या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी हजारो भाविकांनी गोदातिरी गर्दी केली. जय श्रीराम, जय सीता रामच्या गजरात संपूर्ण पंचवटी भक्तिमय वातावरणात न्हालं.

भक्तिमय वातावरणात रथोत्सवाची सुरुवात (Nashik Ram Rathotsav)

श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्यातून सायंकाळी सनई-चौघडे आणि ढोल-ताशांच्या गजरात गरुड आणि श्रीराम रथांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने निघाली. मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या पादुका व भोगमूर्तींची प्रतिष्ठापना करून महाआरती करण्यात आली.

रथ ओढताच वातावरणात रामनामाचा गजर (Nashik Ram Rathotsav)

हिरवा ध्वज दाखवून रथ ओढण्यास सुरुवात झाल्यानंतर “जय श्रीराम बोलेगा” या गाण्यावर तरुणांनी ठुमके लावले. रथाच्या मार्गावर ठिकठिकाणी मुलांनी राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या वेशात भक्तांचे लक्ष वेधून घेतले.

रथोत्सवात मान्यवरांची उपस्थिती

या उत्सवात खासदार राजाभाऊ वाजे, आयुक्त संदीप कर्णिक, आमदार अॅड. राहुल ढिकले, बाळासाहेब सानप, डॉ. सुनील ढिकले, महंत भक्तीचरणदास यांसह अनेक मान्यवरांनी दर्शन घेतले.

आकर्षक रांगोळ्यांनी सजला रथ मार्ग

रथोत्सव मार्गावर महिलांनी पारंपरिक रांगोळ्यांनी सजावट केली. विद्युत रोषणाई, डिजिटल फलक, कमानी व ढोलपथकांनी संपूर्ण नाशिक शहर जल्लोषात रंगून गेले. “हर घर में एक ही नाम, जय श्रीराम बोलेगा” या गाण्याचा जलवा सर्वत्र पाहायला मिळाला.

रामरथाचा प्रवास व पूजन विधी

राम मंदिरातून निघालेली मिरवणूक सिकलेनगर, अक्षय झुला, काट्या मारुती, जुना आडगाव, आयुर्वेद रुग्णालय मार्गे म्हसोबा पटांगण येथे थांबली. दुसरीकडे गरुड रथ नेहरू चौक, मेनरोड, सराफ बाजार मार्गे रामकुंडावर पोहोचला. अखेरीस रामकुंडात विधिवत पूजन व स्नान विधी पार पडला.

रथोत्सवात कसरतीचे प्रदर्शन आणि जल्लोष

रथयात्रेत युवतींनी मर्दानी कसरतीचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांचे लक्ष वेधले. गरुड रथाचे सूत्रसंचालन चंदन पुजारी, तर रामरथाचे रघुनंदन मुठे व अविनाश दीक्षित यांनी केले. विविध आखाड्यांच्या कार्यकर्त्यांनी रथोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.