नाशिकरोड – शिंदेगाव येथे आज दुपारी फटाकेच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीत गोडावून भस्मसात झाले आहे.यात एक कामगार भाजला असून त्यास रुग्णालयात दाखल केले तर काही कामगार गोडावून मध्ये अडकल्याची भीती आहे.चंद्रकांत शिवलाल विसपुते व गौरव चंद्रकांत विसपुते राहणार देवळाली गाव यांचे शिंदेगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावाने गोडाऊन आहे.येणारे सण उत्सवाच्या प्रश्वभूमीवर लाखो रुपये चा फटाके विसपुते यांनी भरून ठेवले होते. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही अज्ञात करनावरून आग गोडावून ला लागली. आग लागताच फटाक्याना त्याची झळ लागली आणि शनार्धत अगीने रुद्र रूप धारण केले. धुराचे मोठ मोठे लोळ दूरवरून दिसू लागले.घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते, अग्निशमक दल तात्काळ पोहोचले.नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पथक घटनास्थळी रवाना झाले.या आगीत एक जण गंभीर भाजला असून दोन ते तीन जण गोडावून मध्ये अडकल्याचे भीती व्यक्त होत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.